Menu
Log in

  • Home
  • Recent Updates

Recent Updates

  • 1 Jun 2020 9:33 AM | MPSSM (Administrator)

    दि. 1 जुलै 2020 रोजी कोविड19 च्या दरम्यान, *महात्मा फुले समाज सेवा मंडळ, करमाळा आणि केअर इंडिया, नवी दिल्ली* यांच्या सहकार्यातुन सोलापूर येथील 'सेक्स वर्कर' महिलांना (400 कुटुंब) अन्नधान्यचे आज वाटप करण्यात आले.

    हे वाटप , समर्पण बहुद्देशीय संस्था, लोकसेवा महिला, युवक व बालविकास सेवाभावी संस्था तसेच क्रांती महिला संघ, सोलापूर यांच्या मार्फत करण्यात आले.

    सदरील अन्नधान्य किट मध्ये 20 किलो गहू , 2 किलो तूरडाळ , चना डाळ 2 किलो , तेल 2 किलो , साखर 2 किलो , चहापत्ती 500 ग्रॅम , पोहे 2 किलो , मीठ पुडा 1 पॅकेट , लाल तिखट पॅकेट , हळद पॅकेट , धने पॅकेट , जिरे पॅकेट ,मोहरी पॅकेट इत्यादी अन्नधान्याचे किट वाटप करण्यात आले.

    सदर अन्नधान्य किट वाटपासाठी महात्मा फुले समाज सेवा मंडळाचे प्रमोद झिंजाडे (बाबा) , करमाळा यांची मोलाची साथ लाभली.

    यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून MIDC पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील, याचबरोबर महात्मा फुले संस्थेचे संजय चौधरी, ऋषिकेश राजूरकर, अब्दुल्ले सर, अभिमन्यू घागरे, हनुमंत कादे , समर्पण संस्थेचे जयंत गोरटे , अभिजीत सोनावणे , समीर सागर , जोतिसिंग मनसावले यांची उपस्थिती होती.

    हा कार्यक्रम क्रांती महिला संघाचे रेणुका जाधव आणि ऋषिकेश तळभंडारे यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षित सामाजिक अंतर ठेवून पार पाडण्यात आला.

  • 28 Jun 2019 9:49 AM | MPSSM (Administrator)

    महात्मा फुले समाज सेवा मंडळ संस्थेला असोचेम च्या माध्यमातून केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत याच्या हस्ते "एक्सलन्स इन द फिल्ड अॉफ वॉटर एज्युकेशन अँड अवेअरनेस" अवार्ड मिळाले.



Follow Us

Copyright© 2020-21 MPSSM. All Rights Reserved.

Powered By
Powered by Wild Apricot. Try our all-in-one platform for easy membership management